सह्याद्रिनगर, कांदिवली (प)
+912228696958
info@ndpatilschools.com

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद”

- कर्मवीर भाऊराव पाटील

प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालय सह्याद्रिनगर, कांदिवली (प)

तत्कालीन महाराष्ट्राची एकंदर चेहरेपट्टी बदलण्याचे लोकोत्तर काम, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. महाराष्ट्रातील दुर्गम वाड्या, वस्त्या व पाड्यापर्यंत शिक्षणाची गंगा या भागिरथाने पोहोचविली. “मी खेड्यापाड्यात, दुर्गम भागात, वंचित, उपेक्षितांसाठी शाळा काढल्या परंतु महाराष्ट्राच्या राजधानीत संस्थेच्या मालकीचे एखादे हायस्कूल असावे”. अशी इच्छा कर्मवीर आण्णांनी त्यांच्या हयातीत डॉ.एन.डी.पाटील साहेब यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या कर्मवीर आण्णांच्या स्वप्नपूर्तीसाठी एन.डी.पाटील साहेबांनी सन १९९२ साली रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल शाळा सुरु केली.

पुढील पानावर ​
पद्मभूषणपद्मभूषण

डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समर्पित जीवनाचा तेजस्वी आलेख

नाव : भाऊराव पायगोंडा पाटील 
जन्म : २२ सप्टेंबर १८८७
जन्मगाव : कुंभोज,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर (महाराष्ट्र )
शिक्षण : नॉन मॅट्रिक
नोकरी :ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लि. मध्ये विक्रेता प्रतिनिधी ( १९०९ ते १९२१ )

संपुर्ण माहिती
शाखेची निकालाची परंपरा

२००८ – ९६.६६%
२००९ – ९०.००%
२०१० – ९२.१८%
२०११ – ९१.९४%
२०१२ – ९८.३६%
२०१३ – ९६.८२%
२०१४ – १००%
२०१४ – १००%
२०१५ – ९८.००%
२०१६ – ९७.९२%
२०१७ – ९३.१८%

शाखेने आजपर्यंत मिळविलेले यश

मार्च ९८ परीक्षेत अनिल ढेब हा विद्यार्थी मुंबई बोर्डातून अपंगातून द्वितीय.
सन २००९-१० संस्थेचे ‘कर्मवीर पारितोषिक’ प्राप्त.
सन २००९-१० बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाचा ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री उमाकांत वसंतराव जगताप यांना प्राप्त.
सन २०१५-१६ हडपसर येथील रयत विज्ञान परिषदेत शाळेच्या अॅक्टीव्हीटीस तृतीय पारितोषिक.
सन २०१५-१६ संस्था वर्धापनदिना निमित्त दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दिला जाणारा आदर्श विद्यार्थी पुरस्कार लोकरे अजय संजय यास मिळाला.
सन २०१६-१७ संस्था वर्धापनदिना निमित्त दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दिला जाणारा दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री प्रबळकर निवृत्ती सुधीर यांना मिळाला.

शाखेचा कालखंडानुसार विकास

शाखेचा कालखंडानुसार विकास :- जुलै १९९२ न्यू इंग्लिश स्कूल या नावाने पञ्याच्या शेडमध्ये बैठ्या इमारतीमध्ये शिशु वर्ग, इ. ४ थी, ५ वी व ८ वी अशा चार वर्गाच्या स्वरुपात शाखेची सुरुवात.
मार्च १९९५ एस. एस. सी. परीक्षेस पहिली बॅच प्रविष्ठ व ८३.३३ टक्के निकाल.
मार्च ९८ परीक्षेत अनिल रत्नकांत ढेब हा विद्यार्थी मुंबई बोर्डातून अपंगातून द्वितीय.
२००२ पासून सातत्याने ९० टक्के पेक्षा अधिक निकाल
१ सप्टेंबर २००३ नवीन इमारत भूमिपूजन
२००८-२००९ इमारतीचे बांधकाम पूर्ण व विद्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर.
१८ जून २०१३ इमारतीचे उद्घाटन व प्रा. डॉं. एन. डी. विद्यालय सह्याद्रिनगर नामकरण.
२००९-१० संस्थेचे आदर्श विद्यालय ‘कर्मवीर पारितोषिक’ प्राप्त.

विद्यार्थ्यांसाठी राबविलेले नवोपक्रम

डिजिटल शिक्षण प्रणाली.
स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट
वाढदिवस अभिष्टचिंतन
गणित प्रयोगशाळेचा वापर
शून्य कचरा वर्ग.

प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य
१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर 
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य

संपुर्ण माहिती

अभिप्राय

भाऊरावांनी शिक्षण मंदिरे उभारली आहेत .जनता-जनार्दनाची ते अढळ निष्ठेने सेवा करीत आहेत.पांडुरंगाचे अधिष्ठान आणखी ते कोठे असणार ?

लोकसंत गाडगे बाबा

जन्मभर पददलितांची सेवा करण्याचे असिधाराव्रत स्वीकारून त्यांना शहाणे करण्याचे थोर कार्य करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी मला नितांत आदर वाटतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

सामर्थ्यवान व गुणसंपन्न अशी माणसे तयार करणे व त्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे हे भाऊरावांच्या कार्याचे रहस्य आहे

यशवंतराव चव्हाण
मा. मुख्यामंत्री 

“कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगतात फार मोठी क्रांती केली
आहे.श्रमातून शिक्षण प्राप्त करण्याचा महान मूलमंत्र त्यांनी जनतेला दिला आणि मानवी
समतेचा आदर्श जनतेपुढे ठेवला.”

पं. जवाहरलाल नेहरू
मा. पंतप्रधान 

‘रयत’ आणि कर्मवीर भाऊराव पाटील ही माझी सदैव प्रेरणा राहिली आहे.शुभेच्छांसह!!!

माननीय आमदार कपिल पाटील
विधानपरिषद सदस्य

प्रगत शाळा,शाळा सिद्धी ‘अ’ श्रेणी मानांकन व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर

डिजिटल शिक्षण प्रणाली.,स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट,वाढदिवस अभिष्टचिंतन, गणित प्रयोगशाळेचा वापर, शून्य कचरा वर्ग..

ब्लॉग्स

महाराष्ट्राच्या कडेकपा-यांना लिहितं-वाचतं करणारा एक महान कर्मयोगी “कर्मवीर भाऊराव पाटील”

कर्मवीर भाऊरावांनी महाराष्ट्राच्या कड्या-कपा–यांना लिहितं-वाचतं केले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे तेराव्या शतकात महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहेत,तेवढेच या ज्ञानवंत कर्मवीर भाऊरावांचे विसाव्या शतकात महाराष्ट्रावर उपकार आहेत.प्रत्येक गावात एखादे देऊळ असे असते की,ज्याचे शिखर[…]

Read more

ज्ञानरचनावाद शिक्षणाचा पाया

I never teach my pupils,I only attempt to provide the conditions in which they can learn. Albert Einstein मुले स्वतः च आपल्या ज्ञानाची निर्मिती करीत असतात.मुलांची ज्ञाननिर्मितीची ही नैसर्गिक पद्धती[…]

Read more

आता नको आय.ए.एस.सेवा , हवी आहे आय.डी.एस.सेवा’ I.A.S.- INDIAN ADMINISTRATIVE SERVICES I.D.S.-INDIAN DEVELOPMENT SERVISES

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षे होत आहेत.या सत्तर वर्षात भारताची लोकसंख्या अंदाजे १२० कोटी झाली आहे.अजूनही निरक्षरता आहे,कुपोषण आहे,प्राथमिक शिक्षणाची आबाळ आहे तसेच आरोग्य सेवा नाही, जी आहे[…]

Read more