प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालय सह्याद्रिनगर, कांदिवली (प)
स्थापना वर्ष व पूर्व स्थिती:-
तत्कालीन महाराष्ट्राची एकंदर चेहरेपट्टी बदलण्याचे लोकोत्तर काम, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. महाराष्ट्रातील दुर्गम वाड्या, वस्त्या व पाड्यापर्यंत शिक्षणाची गंगा या भागिरथाने पोहोचविली. “मी खेड्यापाड्यात, दुर्गम भागात, वंचित, उपेक्षितांसाठी शाळा काढल्या परंतु महाराष्ट्राच्या राजधानीत संस्थेच्या मालकीचे एखादे हायस्कूल असावे”. अशी इच्छा कर्मवीर आण्णांनी त्यांच्या हयातीत डॉ.एन.डी.पाटील साहेब यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या कर्मवीर आण्णांच्या स्वप्नपूर्तीसाठी एन.डी.पाटील साहेबांनी सन १९९२ साली रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल शाळा सुरु केली. ही शाळा सह्याद्रिनगर या हातगाडी कामगारांच्या वसाहतीत सुरु करण्याची विनंती कामगार नेते जयवंतराव पिसाळ, भाऊसाहेब कदम, दत्तात्रय जगताप, विठ्ठल गुरुजी जगताप, विष्णू साबळे, संपत(आबा) जगताप, मदन चव्हाण, मोतीराम मुळीक या मंडळींनी संस्थेकडे केली.
२६ एप्रिल, १९९२ रोजी सह्याद्रिनगर मधील प्रतापगड इमारतीसमोरील रस्त्यावर एक टेबल खुर्ची मांडून एन.डी.साहेबांनी पहिली सभा घेतली. या वसाहतीमध्ये राहणारे अनेक लोक हे रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी होते. संस्थेवर व एन.डी.साहेबांच्या कार्यावर प्रेम करणारे अनेक लोक सभेला हजर होते. साहेबांनी आपल्या भाषणात उपस्थितांच्या हृदयाला हात घातला व तुमच्या मुलांच्या दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी आजपासून माझी. असा विश्वास दाखविला. सर्वांची अंतःकरणे हेलावून गेली. आणि शाळेला इमारत नसताना देखील तब्बल १६७ अॅडमिशन झाली. बंडूमामा जाधव या ठेकेदाराने १३ दिवसात ५ वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण केले. संस्थेच्या चेअरमनपदाची जबाबदारी असतानाही मा.एन.डी.साहेब महिन्यातील किमान दोन दिवस या शाळेसाठी देत होते. कै.कीर्तन गायकवाड या आपल्या विद्यार्थ्याकडे सेवानिवृत्त असतानाही शाळेची जबाबदारी त्यांनी सोपविली होती. त्यांनी अतिशय सक्षमपणे व प्रामाणिकपणे ती पेलली व १ जुलै १९९२ ला शाळा अधिकृत सुरु झाली.
शाखा विकासात स्थानिक मान्यवरांचे योगदान:-
शाळेच्या टेम्पररी शेडपासून ते आताच्या भव्य इमारतीपर्यतच्या २६ वर्षच्या प्रवासात अनेकांनी आपले योगदान दिले. ज्यामध्ये श्री.रावखंडेसाहेब यांनी ५ खोल्यांसाठी पत्रा दिला. मा.विजयसिंह पाटणकर साहेब (माजी अतिरिक्त आयुक्त बृहन्मुंबई महापालिका) यांनी इमारत बांधकामांसाठी आवश्यक असणा-या सर्व प्रकारच्या परवानग्या मिळविण्यात मोलाचे सहकार्य दिले. शिवाय प्राथमिक शाळेला अनुदान मिळवून देण्यासाठी त्यांनी सर्व ताकदीनिशी प्रयत्न केले. कापड बाजार बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष, कामगार उपायुक्त मा.शेखसाहेब व बोर्डाचे सचिव नाईकसाहेब यांनी बिल्डींग नंबर १७ मधील दवाखान्यासाठी असणारी १० नंबरची खोली ३ वर्ष वापरण्यास विद्यालयाला दिली. दिवंगत आर.ए.पाटील सरांनी सुरुवातीला काही रक्कम वाघे हायस्कूल मधून दिली.
विद्यालयात बालवाडी वर्गापासून इयत्ता १० वी पर्यंतचे वर्ग आहेत. विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे १९९५ ला पुन्हा २ वर्ग व कार्यालयाचे बांधकाम करण्याचे आदेश एन. डी सरांनी दिले. या वाढिव इमारत बांधकामाची पायाभरणी संस्थेचे माजी सचिव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष बॅ.पी.जी.पाटील सर यांच्या हस्ते झाली. कर्मवीरांच्या एन.डी. व पी.जी. या दोन लाडक्या कार्यकर्त्यांचा स्पर्श या शाळेला आहे. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. नवीन इमारत बांधकाम करत असताना एन.डी.पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समितीमध्ये काम करणारे दिवंगत मनोहर भाई पालशेतकर साहेब यांनी स्वतः रुपये ५०,००० देणगी देवून अतिशय प्रामाणिकपणे उत्तम काम केले. मा.सरोजताई पाटील (माई) यांनी आपली शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कौशल्ये आमच्यात रुजवली. एक आदर्श मुख्याध्यापक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण माई आहेत. माईचे मार्गदर्शन बांधकामात तर मिळालेच परंतु त्याबरोबर गुणवत्ता वाढीसाठी त्या अधिक आग्रही होत्या म्हणून सन २००४ नंतर विद्यालयाचा एस.एस.सी परीक्षेचा निकाल ९५ % पेक्षा कधी कमी लागला नाही. जनरल बॉडी सदस्य मा. मोहनराव केळुस्कर यांचेही इमारत बांधकाम व गुणवत्ता वाढीसंदर्भातील योगदान लाभले आहे. विद्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर occupation certificateमिळवणे व जमिनीचे पोटविभाजन करून रस्त्यात गेलेल्या जमिनीचे महापालिकेला हस्तांतरित करण्यासंदर्भातील अनेक दिवस रखडलेले महत्वाचे काम सतत पाठपुरावा करून आर्किटेक्ट व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.प्रशांतदादा पाटील यांनी पूर्ण केले आज दिसणा-या सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा छान इमारतीचे सारे श्रेय एन.डी.पाटील साहेब, बांधकाम कमिटी व माईना जाते.
शाखेस लाभलेले मुख्याध्यापक, त्यांचे योगदान व त्यांनी केलेले बदल:-
- कै.कीर्तन गायकवाड ( सेवा निवृत्त मुख्याध्यापक ) जुलै १९९२ ते १९९६ या कालावधीत कै.कीर्तन गायकवाड सरांनी मुख्याध्यापक पदाची धुरा सक्षमपणे सांभाळली. शाखा स्थापनेत पुढाकार घेऊन सुरवातीची टेम्पररी पत्रावजा शेड इमारत बांधकाम करून रयतेचे उत्तम संस्कार त्यांनी शाळेत रुजविले.
- श्री धनवडे सुरेश धोंडीबा (मुख्याध्यापक) सन १९९६ ते ३०,एप्रिल २००३ श्री धनवडे सुरेश धोंडीबा (मुख्याध्यापक) गुणवत्तावाढीसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम वाढविण्याचा प्रयत्न केला व नवीन इमारतीची पायाभरणी केली.
- श्री गावीत दादा चिंतामण (मुख्याध्यापक) दिनांक: १ मे २००३ ते आजअखेर, श्री गावीत दादा चिंतामण मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे कालावधीत विद्यालयास मिळालेले योगदान व झालेले बदल.
- दिनांक ११ सप्टेंबर २००३ रोजी नवीन इमारतीच्या जागेचे भूमीपूजन झाले.
- शाळेच्या जागेचे संरक्षक भिंतीचे बांधकाम व नवीन आर.सी.सी. दोन मजली इमारतचे बांधकाम पूर्ण.
- सन २००८-०९ ला विद्यालय नवीन इमारतीत स्थलांतर.
- महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व प्रा.डॉ.एन.डी.पाटील विद्यालय असा नामकरण समारंभ १८ जून २०१३ रोजी संपन्न झाला.
- दिनांक ११ डिसेंबर २०१६ रोजी विद्यालयाचा ‘रौप्य महोत्सव सोहळा’ मा.प्रा.डॉ.एन.डी.पाटील साहेब व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
- विद्यालयात सर्व वर्गात, व्हरांड्यात, विद्यालयाचे प्रवेशद्वार, मैदान इत्यादी महत्वाच्या ठिकाणी १६ C.C.TV. कॅमेरे बसविले आहेत.
- सर्व इयतांसाठी नवनीत इसेन्सचे डिजिटल क्लासरूम – Projector, Interactive board, Speakers, CMK Cabinet, Teacher Remote , Laptop, Power back up 15 minutes . अशा हार्डवेअरचे सहा वर्गांसाठी ३ संच software सह कार्यरत आहेत.
- शैक्षणिक वर्ष २०१३-१४ इयत्ता ५ वी पासून सेमी इंग्रजीचे संस्था व शिक्षण विभागाच्या पूर्व परवानगीने वर्ग सुरु.
- मा.आमदार योगेशजी सागर साहेब यांचे आमदार निधीतून संगणक संच व खेळ साहित्य.
- नूतन इमारत बांधकामासाठी सन २००३ मध्ये विद्यालयाचे आजी, माजी व बदलून गेलेले रयत सेवक व विद्यार्थी यांचे कडून सुमारे ५ लाख रु. निधी जमा.
शाखेची निकालाची परंपरा :-
सातत्याने तो ९० % पेक्षा अधिक आहे. मार्च २०१४ चा निकाल १००% लागला.
२००४ – ९०.३८%
२००५ – ८४.७४%
२००६ – ९२.१८%
२००७ – ९३.४४%
२००८ – ९६.६६%
२००९ – ९०.००%
२०१० – ९२.१८%
२०११ – ९१.९४%
२०१२ – ९८.३६%
२०१३ – ९६.८२%
२०१४ – १००%
२०१५ – ९८.००%
२०१६ – ९७.९२%
२०१७ – ९३.१८%
२०१८ – १०० %
भौतिक सुविधा:-
- नवीन आर.सी.सी. दोन मजली सुसज्ज इमारत
- प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्या.
- विज्ञान प्रयोगशाळा.
- गणित प्रयोगशाळा.
- संगणक कक्ष (इंटरनेट सह).
- ज्ञानसमृद्ध ग्रंथालय.
- विविध प्रकारचे खेळ साहित्य.
- १००० चौ.मी. खेळाचे मैदान.
- पिण्याचे पाणी दोन वॉटर कुलर. इ
- C.C.TV. कॅमे-यांची व्यवस्था.
- सर्व इयतांसाठी नवनीत इसेन्सचे डिजिटल क्लासरूम.
- सर्व वर्गात स्पीकर व्यवस्था.
- विद्यार्थांच्या प्रमाणात स्वच्छतागृहे आहेत.
शाखेचा कालखंडानुसार विकास:-
- शाखेचा कालखंडानुसार विकास :- जुलै १९९२ न्यू इंग्लिश स्कूल या नावाने पञ्याच्या शेडमध्ये बैठ्या इमारतीमध्ये शिशु वर्ग, इ. ४ थी, ५ वी व ८ वी अशा चार वर्गाच्या स्वरुपात शाखेची सुरुवात.
- मार्च १९९५ एस. एस. सी. परीक्षेस पहिली बॅच प्रविष्ठ व ८३.३३ टक्के निकाल. मार्च ९८ परीक्षेत अनिल रत्नकांत ढेब हा विद्यार्थी मुंबई बोर्डातून अपंगातून द्वितीय. २००२ पासून सातत्याने ९० टक्के पेक्षा अधिक निकाल
- १ सप्टेंबर २००३ नवीन इमारत भूमिपूजन
- २००८-२००९ इमारतीचे बांधकाम पूर्ण व विद्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर.
- १८ जून २०१३ इमारतीचे उद्घाटन व प्रा. डॉं. एन. डी. विद्यालय सह्याद्रिनगर नामकरण.
- २००९-१० संस्थेचे आदर्श विद्यालय ‘कर्मवीर पारितोषिक’ प्राप्त.
शाखेने आजपर्यंत मिळविलेले यश:-
- मार्च ९८ परीक्षेत अनिल ढेब हा विद्यार्थी मुंबई बोर्डातून अपंगातून द्वितीय.
- सन २००९-१० संस्थेचे ‘कर्मवीर पारितोषिक’ प्राप्त.
- सन २००९-१० बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाचा ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री उमाकांत वसंतराव जगताप यांना प्राप्त.
- सन २०१५-१६ हडपसर येथील रयत विज्ञान परिषदेत शाळेच्या अॅक्टीव्हीटीस तृतीय पारितोषिक.
- सन २०१५-१६ संस्था वर्धापनदिना निमित्त दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दिला जाणारा आदर्श विद्यार्थी पुरस्कार लोकरे अजय संजय यास मिळाला.
- सन २०१६-१७ संस्था वर्धापनदिना निमित्त दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दिला जाणारा दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री प्रबळकर निवृत्ती सुधीर यांना मिळाला.
- दरवर्षी तालुका स्थरावर सातत्याने विज्ञान प्रदर्शनात यश.
विद्यार्थ्यांसाठी राबविलेले नवोपक्रम :-
- डिजिटल शिक्षण प्रणाली.
- स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट
- वाढदिवस अभिष्टचिंतन
- गणित प्रयोगशाळेचा वापर
- शून्य कचरा वर्ग.
शाखेचे समाजासाठी योगदान :-
- स्वच्छता अभियान
- रोग्य शिबिरे
- अंधश्रद्धा
- निर्मुलनविषयक प्रात्याक्षिके.
शाखेचे सहसंबंध उदा. विशेष केंद्रे, शिक्षणासाठी वाहिलेल्या संस्था :- रोटरी क्लब ऑफ इंडियाच्या माध्यमातून इ. ९ वी साठी स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट व आरोग्य शिबिराचे आयोजन
शाखेला मिळालेले पुरस्कार सन्मान :-सन २००९-१० संस्थेचे ‘कर्मवीर पारितोषिक प्राप्त
विद्यार्थी विकासासाठी भविष्यातील नियोजन :-
- एस. एस. सी. १०० टक्के निकाल
- गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर
- प्रगत शाळा
- शाळा सिद्धी ‘अ’ श्रेणी मानांकन मिळविणे.
स्पर्धा परीक्षेतील यश :-
- २०१३ माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- २०१३ माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- २०१५ माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- २०१७ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीधारक २ व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक ३
- २०१५ आर टी एस गुणवत्ता यादीत १
- २०१६ होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत एका विद्यार्थ्यास रौप्यपदक